माण तालुक्‍यात श्रमदान करुन बाबासाहेबांना अभिवादन

गोंदवले – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वी जयंती साजरी करण्यात आली.विरळी,नरवणे,पुकळेवाडी, वडगाव यांसह अनेक गावांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रमदानास सुरुवात करण्यात आली. यामध्ये गावातील लहान थोर व्यक्ति, शिक्षक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांचा समावेश होता.

चित्रपट अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून पाणी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणाय्‌ा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत माण तालुक्‍यातील अनेक गावांनी सहभाग नोंदविला आहे. त्यानिमित्ताने गावोगावी ग्रामस्थांच्या ऊत्साहाचे तूफान आले आहे. भल्या सकाळी गावातील ग्रामस्थ टिकाव, फावडे घेऊन श्रमदानासाठी शिवारात दाखल होत असून सुट्टीच्या दिवशी शाळकरी मुले,महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नोकरवर्गही या श्रमदानात सहाभागी होत आहे.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्या जयंतीनिमित्त गावोगावी श्रमदानाच्या सुरुवातीस त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुकळेवाडी येथे म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तुषार विरकर, डॉ. प्रमोद गावडे ,बालप्रसाद किसवे यांनी ग्रामस्थांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन श्रमदान केले.
आज स. वा.नरवणे ता.माण येथे सर्व ग्रामस्थ व बौद्ध समाज बांधव यांनी बौद्ध समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.श्रमदान करण्यासाठी गेलेल्या येथील ग्रामस्थांनी श्रमदानाच्या ठिकाणीच डॉ. आंबेडकर ,संत गोरोबा काका कुंभार ,व महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती साजरी केली आणि श्रमदानास सुरुवात केली.यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शिवछत्रपती करिअर ×कॅडमी चे संस्थापक नारायण आहिवळे सर तसेच संचालक अमोल सावंत व त्यांच्यासोबत 25 विद्यार्थ्याच्या टीमने सुद्धा श्रमदान केले.वडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक सोपान काळे, शिक्षिका अश्विनी राऊत, तेजश्री राऊत यांनी ग्रामस्थांसह बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि श्रमदानात सहभागी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)