माण तालुक्‍यात वीज वितरणविरोधात संतापाची लाट

महावितरण विभागाचे उपअभियंता प्रशांत वाघ यांच्या बिला संदर्भात चर्चा करताना राजू मुळीक, वैभव जाधव, सागर जाधव व इतर.

वीज बिला संदर्भात ग्राहक प्रबोधन समिती, शेतकरी संघटना आक्रमक
दहिवडी, दि. 3 (प्रतिनिधी) –  चार-पाच वर्षांपासून शेतीपंपाची अनेक वीज कनेक्‍शन देणे प्रलंबित आहेत, तसेच अनेक शेतकऱ्यांना वीजेचा वापर नसतानाही भरमसाठ बिले देण्यात आल्याने माण तालुक्‍यात वीज वितरणच्या कारभाराविषयी संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, वीज वितरणने कारभारात सुधारणा केली नाही तर ग्राहक प्रबोधन समिती आणि शेतकरी संघटना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल, अशा इशारा देण्यात आला आहे.
माण तालुक्‍यातील महावितरण कंपनीच्या कारभारात काही सुधारणा होणार की नाही? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या ‘तडजोडी’मुळे शेतकरी, ग्राहक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज कनेक्‍शन चार ते पाच वर्षापासून प्रलंबित असताना देखील मीटरचे फोटो न देता भरमसाठ वीज बिले देऊन कंपनीने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे.
या प्रकरणी आवाज उठवत दहिवडी उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाघ याची भेट घेऊन तात्काळ बिल दुरुस्ती व मिटर बदली करून मिळावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष नारायण अहिवळे, ग्राहक प्रबोधन समिती माणचे अध्यक्ष राजू मुळीक, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते वैभव जाधव, संदीप चव्हाण, सागर जाधव, गंगाराम गोडसे, वैभव कुंभार, शुभम खांडे आदी उपस्थित होते.
तालुक्‍यात शेकडो शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज जोडणी बाकी आहे. शेतकरी वीज कंपनी कार्यालयात खेटे घालत आहेत, बिल कमी करण्यासाठी शेकडो शेतकरी व नागरिक महावितरण विभागाच्या दारात बसून राहत आहेत. त्यांना कधी वीज जोडणी मिळणार? याची माहिती अधिकारीही देत नाहीत. डिपॉझिट भरून देखील वीज कनेक्‍शन तोडण्याची कारवाई मात्र महावितरण कंपनीने चालूच ठेवली आहे. यावर काही तरी उपाययोजना करावी अन्यथा आम्ही महावितरण विभागा समोर आत्मदहन करणार असल्याचे राजू मुळीक यांनी सांगितले आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)