माण तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी दादासाहेब काळे

बिजवडी, दि. 14 (प्रतिनिधी) – माण तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची निवड झाली आहे. आ. जयकुमार गोरे यांचे समर्थक असलेले काळे धनगर कृती समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहे.
कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडींमध्ये उपाध्यक्षपदी अजित खाडे, सरचिटणीसपदी डॉ. सागर सावंत, अंकुश शिर्के, रोहन गोडसे, नीता जाधव, वैभव पाटील, सचिन बोराटे यांची निवड झाली आहे. दादासाहेब काळे यांनी आंधळीचे बिनविरोध सरंपच म्हणून यशस्वी कारकिर्द केली आहे. या दरम्यान त्यांनी गावचा सर्वांगीण विकास साधला आहे. 2012 मध्ये आंधळी जि. प. गटातून सदस्य निवडून आल्यानंतर गटातील गावात विविध कामे करून जनतेचा विश्वास सार्थकी लावला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजबांधवांनी उभारलेल्या जनआंदोलनात पुढाकार घेतला होता. या निवडीबद्दल आ. जयकुमार गोरे, एम. के. भोसले, अर्जुन काळे, जि. प. चे माजी सभापती ऍड. भास्कराव गुंडगे, माढा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, जि. प. सदस्य अरुण गोरे, हरिभाऊ जगदाळे, संजय गांधी, संजय जगताप तसेच तालुक्‍यातील कॉंग्रेसचे सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)