म्हसवड – शासनाने पत्रकार सरंक्षण कायदा मंजूर करत इतर मागण्याही मान्य केल्या. मात्र त्याची आजअखेर अंमलबजावणी केली नसल्याने माण तालुका पत्रकार संघाच्या वतीने म्हसवड पोलिस ठाण्यात आंदोलन करून तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा पुढील काळात मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनद्वारे दिला आहे.
माण तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने म्हसवड पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले व म्हसवड पोलिस ठाण्याचे पीएसआय शहाजीराजे गोसावी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की पत्रकार संघटनेच्या विविध मागण्या गतवर्षी शासनाने मंजूर केल्या होत्या. पत्रकारांसाठीचा संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार यांना पेन्शन योजना आदि मागण्या मान्य केल्या. परंतु, त्याची अंमलबजावणी केली नाही. पुढील काळात तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनद्वारे दिला आहे.
निवेदन पी. एस. आय.शहाजीराजे गोसावी यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिध्दार्थ सरतापे , उपाध्यक्ष दिलिप कीर्तने, संस्थापक अध्यक्ष पोपट बनसोडे, विजय भागवत, विजय टाकणे, विजय ढालपे अहमद मुल्ला, विशाल माने, धनंजय पानसांडे, सागर सावंत, शिवशंकर डमकले, अजित काटकर, सुशील त्रिगुणे, सागर बाबर आदी पत्रकार उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा