माण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल उत्साहात

दहिवडी: विजेत्या व उपविजेता संघांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा साधना गुंडगे, पुरुषोत्तम जाधव, प्रीतम खोत.

दहिवडी, दि. 29 (प्रतिनिधी) – तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा प. म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी येथे पार पडल्या. यामध्ये मुलांच्या गटात 14 व 17 वर्षाखालील पाच तर 19 वर्षाखालील चार संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये 14 व 17 वयोगटामध्ये जय भवानी विद्यालय पिंगळी यांनी विजय प्राप्त केला. महात्मा गांधी विद्यालय उपविजेते ठरले. 19 वयोगटामध्ये दहिवडी कॉलेज दहिवडी विजेते ठरले तर महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज उपविजेता ठरले.
मुलींच्या स्पर्धेत 14 व 17 वयोगटामध्ये प्रत्येकी चार व 19 वयोगटामध्ये दोन महाविद्यालयाने सहभाग नोंदवला. यामध्ये 14 व 17 वयोगटात प.म शिंदे कन्या विद्यालय दहिवडी विजयी झाले. उपविजयी – वीर संताजी घोरपडे विद्यालय कारखेल यांनी पटकावला. तसेच 19 वर्षे खालील विजेतेपद दहिवडी कॉलेज दहिवडीने पटकावले व उपविजेता महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज उपविजेते ठरले. सर्व विजेत्याचे व उपविजेत्यांचे प. म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दहिवडीच्या नगराध्यक्षा साधना गुंडगे, पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, सपोनि. प्रवीण पाटील, नंदकुमार खोत, लिंगराज साखरे, दिनेश दवे, प्रीतम खोत उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)