माण गावहद्दीत खैराची 176 वृक्षांची कत्तल

सातारा – मिळालेल्या गुप्त तक्रारीनुसार सलग दोन दिवस-रात्र पाळत ठेऊन मौजे राणंद ता. माण गावहद्दीत भवानी माता मंदिर टेकडीच्या पायथ्याशी खैराची 176 झाडे अवैधरित्या तोडून तस्करी करण्याच्या उद्देशाने जमा करण्यात आलेले पाच साठे छापा घालून जप्त करण्यात आले.

महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 नुसार हा गुन्हा असून या प्रकरणात सुमारे 1 लाख रू. किंमतीचा 22 घ. मी. माल जप्त करण्यात आला. वरील कारवाई डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गवारे, वन परीक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन, सातारा यांनी गजानन भोसले, वनपाल दीपक गायकवाड़, वनरक्षक सुहास पवार, राजेश वीरकर, पोलीस हवालदार, दिनेश नेहरकर, वाहनचालक यांच्या सोबतीने पार पाडली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)