माणूस मोहाच्या जाळ्यात अडकतो आहे – हभप देशमुख

मंचर – गावातील शाळा, आरोग्य केंद्र किंवा पिण्याच्या पाण्यासाठी लागणारी जागा गावातील नागरिक मोफत देत असायचे. आता मात्र समाजात दान करण्याऐवजी मला त्यातून काही मिळते का, यासाठी स्वार्थ वाढला आहे. दिवसोंदिवस माणूस स्वार्थी बनला असून, मोहाच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची खंत हभप शालिनी निवृत्ती देशमुख यांनी व्यक्त केली. मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गणेश मंदिरात चतुर्थी निमित्ताने झालेल्या कीर्तन कार्यक्रमात भाविकांना मार्गदर्शन करताना हभप देशमुख बोलत होत्या. यावेळी माजी सरपंच जिजाभाऊ मेंगडे, सुरेश वायाळ, दीपक ठेंबेकर, देवस्थान टस्टचे अध्यक्ष रत्नाकर मेंगडे, साहेबराव मेंगडे, उत्तम मेंगडे, सुयोग मेंगडे, पोपटराव मेंगडे, संजय गोरे उपस्थित होते. मनुष्य जन्म एकदाच आहे; परंतु स्वतःच्या जीवनाचे महत्त्व मात्र कळत नाही. अपंगत्व आल्यास शरीराचे महत्त्व समजते; परंतु जोपर्यंत माणूस शरीराने धडधाकट आहे, तोपर्यंत त्याच्यातील अहंकार कमी होत नाही. व्यसनाधीन नागरिकांमुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत; परंतु व्यसन मात्र समाजात कमी होताना दिसत नाही. समजून घेण्याची मानसिकता नसल्याने दिवसोंदिवस समाजात सुरक्षिततेची भावना राहिली नसल्याचे शालिनी देशमुख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)