माणसांच्या कृत्यांना पशूची उपमाही देता येणार नाही-प्रकाश आमटे

 मुंबई : समाजात काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी सकाळचे वर्तमान पत्र उघडले की त्यात बलात्कार, चोऱ्या, खून अशा बातम्या वाचायला मिळतात. अशावेळी माणसाला पशूची उपमा दिली जाते. मात्र, माणसांच्या कृत्यांना पशूची उपमाही देता येणार नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.

आदिवासी भागात काम करीत असताना अनाथ असलेले सिंह, वाघ, आसवल, तरस यासारखे प्राणी आम्ही पाळले आहेत. अगदी विषारी साप सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी कधीही मला इजा पोहचवली नाही. माणसाने त्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांनी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत प्रवेश केला असेल, ही बाबही आमटे यांनी नमूद केली. माणसाने सुसंस्कृत असायले हवे. माणूस सिव्हीलाईज झाला असे म्हणण्याऐवजी पशू सिव्हीलाईज चांगल्या प्रकारे झाला आहे, असे म्हणायची वेळ आली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)