माणमध्ये पुन्हा वॉटर कप आणण्याचा हस्तनपूरकरांचा निर्धार

जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याचा निर्धार ; लोकवर्गणी जमा करण्यास प्रारंभ

बिजवडी – माण तालुक्‍यात पाणी फौंडेशनच्या कामाने जलक्रांती केली आहे. तालुक्‍यातील टाकेवाडी, भांडवली, बिदाल गावांपासून प्रेरणा घेत हस्तनपुरच्या गावकऱ्यांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार केला आहे. पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत माण तालुक्‍यातील बहुतांश गावांनी सहभाग घेत जलसंधारणाची ऐतिहासिक कामे करून दाखवली आहेत. वॉटर कप स्पर्धेचे पुढचे पर्व लवकरच सुरू होत असून यासाठी पूर्वतयारी होऊ लागली आहे. हस्तनपूर गावानेही मार्गदर्शकांच्या उपस्थितीत गावात बैठक लावून गावात जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याचा निर्धार करत लोकवर्गणी जमा करण्यास प्रारंभ केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, कामानिमित्त गावाबाहेर असलेल्या ग्रामस्थांनीही मुंबईत जलसंधारणाच्या कामासंदर्भात बैठक लावली होती. बैठकीत आयकर आयुक्त नितिन वाघमोडे, आरटीओ ऑफिसर गजानन ठोंबरे, पाणी फाऊंडेशनचे माण तालुका समन्वयक अजित पवार, अनभुलेवडीचे संपतनाना इंगळे, बाळासो कदम यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला हस्तनपूर गावातील पण कामानिमित्त मुंबईत असलेले ग्रामस्थ सहकुटूंबासह उपस्थित होते.

यावेळी सीमा नामदेव किसवे व शोभा संजय खताळ यांनी मनोगत व्यक्त करून पाणी फाऊंडेशनसाठी निधी व श्रमदानासाठी तयारी दर्शवली. सर्व महिलांनी श्रमदान करण्यासाठी स्पर्धा काळात सुट्टी टाकून गावी येण्याचा निश्‍चय केला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या उत्पल खताळ याने शिष्यवृत्तीची रक्कम पाणी फाऊंडेशन कामासाठी देण्याचे घोषित केले. हेमंत तानाजी कीसवे यांनीही दुकानाचा दोन महिन्यांचा होणारा नफा पाणी फाऊंडेशन कामासाठी देण्याचे घोषित केले. तसेच इतर बऱ्याच गावकऱ्यांनी मदत तसेच श्रमदान करून गाव पाणीदार करण्याचा निर्धार व्यक्त करत वॉटर कप पुन्हा एकदा माण तालुक्‍यात आणण्याचा निर्धार व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)