माणमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली

वरकूटे व जांभुळीत पाण्याच्या टॅंकरची मागणी

म्हसवड, दि. 30 (प्रतिनिधी) – माण तालुक्‍यात दुष्काळाचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. माणमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली वरकूटे व जांभुळीत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी वाढू लागली असून जांभुळणी व वरकूटे, शेणवडी या गावांना सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या गावात पाण्याचा टॅंकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडे करण्यात आली आहे.
याबाबत जांभुळणी ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2011च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या सुमारे 3 हजार 143 इतकी आहे. या गावासाठी गावठाण बेघरवस्ती व मिनी वॉटर सल्पाय या दोन्ही योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या दुष्काळाचे तीव्र चटके तालुक्‍याला बसू लागल्याने भुगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. त्याचा परिणाम प्रत्येक गावच्या पाणी पुरवठा योजनेवर झाला आहे. जांभुळणी गावालाही याचा फटका बसला असून गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड कि. मी. रोज पायपिट करावी लागत आहे. जांभुळणी गावचे क्षेत्र हे फार मोठे असून गावाला वाड्या-वस्त्यांचा वेढा आहे. सध्या गावालाच पाणी पुरेसे मिळत नसल्याने परिसरात तर बिकट अवस्था आहे. येथील बेघरवस्ती, जोगूबाई वस्ती, फिटरवस्ती, विठ्ठल नगर, शिंदे वस्ती हा परिसर गावापासून 2 ते 7 कि.मी. अंतरावर याठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. याठिकाणी पाण्याचे टॅंकर तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)