माणमध्ये दुष्काळकडे दुर्लक्ष ; निवडणुकांकडे लक्ष

नुसत्या सोशल मीडियावर नेत्यांच्या विकासाच्या गप्पा, जनावरांचे मात्र चारा-पाण्याचे हाल

बिदाल – माण तालुक्‍यातील राजकीय नेते हे आगामी लोकसभा -विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन प्रचाराचे काम सुरू केले आहे. मात्र तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या रब्बी हंगाम सुध्दा धोक्‍यात आल्यामुळे जनावरांच्या चारा प्रशन निर्माण झाला आहे. पण एका सुध्दा राजकीय नेत्यांनी चारा छावणी सुरू केली नाही. चारा छावणीसाठी नेते आंदोलन करत नाहीत, अशी चर्चा तालुक्‍यातील मतदारामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माण तालुक्‍याचे आमदार होण्याची स्वप्न अनेकांना पडत असली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र, त्यांच्या पुढे गेले आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे आमदारकीचे मोठे होर्डिंग रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी लावत आहे. परंतु जनावरांना चारा मोफत कधी देत नाहीत. याआधीच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही करोडो रुपये खर्च केलेला तालुका आहे. त्यामुळे तालुक्‍यात पैसे आल्याने अनेकजण आमदारकीची स्वप्ने रंगवत आहेत.

सर्वच नेते मतदारांच्या भेट घेत आहेत पण शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा व पाणी यांवर काहीच बोलत नाहीत. त्यांच्या समर्थकांना शेतकऱ्यांना व्यथा माहिती असतानासुध्दा सोशल मिडीयावर नुसत्या विकासांच्या गप्पा सुरू आहेत. सध्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मेळावे सुरू आहेत. पण दुध दर, जनावरांच्या चाराटंचाई याविषयी कोणी बोलत नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, सहपालक मंत्री यांनी माणमध्ये दुष्काळी आढावा बैठकही घेतली नाही.

काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या अनेक नेत्यांचे वाढदिवस झाले, काहींचे होत आहेत. कार्यकर्ते मोठे होर्डिंग लावत आहेत. होल्डिंगमध्ये भावी आमदार असे लिहिले जात आहे. काहीजण तर चक्क आमदार असा उल्लेख करीत असल्याने तालुक्‍याला आमदार किती असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्‍न पडला आहे. माण तालुक्‍यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, रासप हे पक्ष सक्रीय आहेत. या पक्षातील अनेक नेते आमदारकीची स्वप्न पाहत आहेत. निवडणूक लढविण्याची पूर्वतयारी होर्डिंगच्या माध्यमातून सुरू झाली असून निवडणुका होईपर्यंत होर्डिंग युद्ध अनुभवायला मिळणार आहे.

लोकसभा- विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांचा अप्रत्यरित्या बिगुल सर्वच पक्षांनी वाजविला आहे. अनेक कार्यक्रमात विरोधकांना जाहिररित्या टोले लगावले जात आहेत. शक्‍तीप्रदर्शन केले जात आहे. यामुळे निवडणुकी आधी माण विधासभा मतदारसंघात राजकारण तापू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)