माणच्या उत्तरेकडील गावांच्या पाणीप्रश्नासंदर्भात कार्यवाहीचे आदेश

मुंबई ः जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांना निवेदन देताना प्रभाकर देशमुख, डॉ.संदीप पोळ व इतर.

बिजवडी,दि. 5 (वार्ताहर) – माण तालुक्‍याच्या उत्तरेकडील वंचित गावांना जिहे -कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात सोडून लिफ्ट इरिगेशनद्वारे पाईपलाईनने द्यावे अशा मागणीचे निवेदन माण-खटाव मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ.संदीप पोळ यांनी खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांना दिले होते. तर उरमोडीचे पाणी कायम मिळावे या मागणीतही खासदार महोदयांनी पुढाकार घेत जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांची मुंबई येथे शिवनेरी बंगल्यावर बैठक घडवून आणत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाकर देशमुख व डॉ.संदीप पोळ यांनी माण तालुक्‍याच्या पाणी प्रश्नासंदर्भात सविस्तर अडचणी समजावून सांगितल्यानंतर जलसंपदा मंत्रीमहोदयांनी या भागाचा सर्व्हे करून पुढील कार्यवाही करण्याबाबतचे तात्काळ आदेश संबंधित खात्याला दिले आहेत. मंत्रीमहोदयांनी सकारात्मक पाऊले उचलल्याने जिहे-कटापूरचे पाणी वंचित भागांना मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचीही माहिती डॉ.संदीप पोळ यांनी दिली.
यावेळी माजी आ. हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते -पाटील, आ. हनुमंत डोळस, आ.दत्तात्रय भरणे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माण- खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. संदीप पोळ यांच्यासह माणच्या उत्तरेकडील वंचित गावांचे प्रतिनिधींसह तालुक्‍यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माण तालुक्‍यातील उत्तरेकडील बिजवडी, शिंगणापूर, मोही, मार्डीसह परिसरातील वंचित गावांचा सर्व्हे करून जिहे -कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात सोडून तेथून उत्तर भागातील वंचित गावे व वाड्यावस्त्या वरती पाणी लिफ्ट करून पाईपलाईनने मिळावे अशी मागणी करण्यात आली होती.
याबैठकी दरम्यान उरमोडीचे पाणी म्हसवड भागाला सोडण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी मंत्रीमहोदयांनी उरमोडीचे पाणी तात्काळ राजेवाडीपर्यंत सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
या बैठकीसाठी खा. विजयसिंह मोहिते -पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी पुढाकार घेतला होता. माणच्या उत्तरेकडील गावांच्या पाणीप्रश्नाचे निवेदनही ना. गिरीष महाजन यांना खासदार मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)