माणगावकर, फडते स्क्वॅश स्पर्धेचे विजेते

मुंबई: राष्ट्रीय विजेता महेश माणगावकरने पुरुष तर यश फडते याने 19 वर्षाखालील मुलांच्या विभागात मुंबई येथे पार पडलेल्या सीसीआय वेस्टर्न इंडिया स्क्वॅश अजिंक्‍यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

पुरुष विभागात महेश माणगावकर आणि विक्रम मल्होत्रा यांच्यात विजेतेपदाची लढत होणार होती. परंतु, विक्रम मल्होत्रा मासपेशींमध्ये ताण आल्याने अंतिम सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे अग्रमानांकीत माणगावकर याला अंतिम सामन्यात विजेता घोषित करण्यात आले. मागील आठवड्यात राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत माणगावकरने पाच सेटमध्ये झालेल्या लढतीत मल्होत्राचा पराभव करत विजेतेपद पटकाविले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, 19 वर्षाखालील मुलांच्या विभागात यश फडतेने अगोदरच्या दोन सामन्यात ऋत्विक राव आणि अग्रमानांकित तुषार शहाणी यांचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर अंतिम फेरीत वीर छोत्रानीचा पराभव करत त्याने विजेतेपदावर नाव कोरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)