अकलूज- खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत 2018-19 या वर्षातील खासदार फंडातून माढा मतदार संघातील उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये व व्यायामशाळांना सुमारे 1 लाख 40 हजार खर्चाच्या 200 खुल्या व्यायामशाळेचे साहित्य मंजूर करण्यात आले आहे.
त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 10 संस्थांना व्यायामशाळांच्या मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, माढा मतदार संघातील उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये व व्यायामशाळांना सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांच्या खुल्या व्यायामशाळांचे साहित्य पुरवण्यात येणार आहे. आज (दि. 25) रामभाऊ जोशी हायस्कुल (करकंब), शिवछत्रपती व्यायामशाळा (खवासपूर), उत्तरेश्वर हायस्कुल (केम), शंकरराव मोहिते महाविद्यालय (माळेवाडी-अकलूज), शिवनेरी तालीम (संग्रामनगर), के. एन. भिसे आर्टस ऍण्ड कॉमर्स महाविद्यालय (कुर्डुवाडी), श्री गाडगेबाबा आश्रमशाळा (गोंदवले बु.), छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ (वडूज), मुधोजी हायस्कुल (फलटण), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (पिंपवडे बु.) या दहा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यायामशाळा मंजुरीचे पत्र दिले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)