माझ्या लग्नाच्या चर्चा निव्वळ अफवा – रोनाल्डिनो

नवी दिल्ली : फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जाणऱ्या रोनाल्डिनोच्या लग्नाच्या चर्चांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या. तो एकाच वेळी दोन्ही प्रेयसींशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. पण, या सर्व चर्चा खोट्या असून, मी तसे काहीही करत नाही, असे खुद्द रोनाल्डिनोनेच स्पोर्ट्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

मला सगळ्यांचे लग्नाविषयीची विचारणा करण्यासाठी सर्वांचे फोन येत आहेत. पण, मी लग्न करतच नाही. हे सर्व धादांत खोटे आहे, असे तो या मुलाखतीदरम्यान म्हणाला. ब्राझीलमधील ‘ओ`डिया’ या वृत्तपत्राने रोनाल्डिनोच्या लग्नाचे वृत्त प्रसिद्ध करत तो एकाच वेळी आपल्या दोन्ही प्रेयसींशी विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले होते. इतकच नव्हे तर एका खासगी सोहळ्यात हा विवाहसोहळा पार पडेल असेही म्हटले गेले होते. पण, या सर्व अफवाच असल्याचे आता स्पष्ट झालं आहे.

रोनाल्डिनो २०१६ पासून, बिट्रीझ सोझा Beatriz Souza हिला डेट करु लागला होता. पण, असंही म्हटलं जातं की बिट्रीझला डेट करताना त्याने प्रिसिलीयासोबतचं Priscilla नातंही कायम ठेवलं होतं. इकतच नव्हे, तर ब्राझीलच्या स्थानिक वृत्तपत्रांच्या माहिनुसार गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून तो आपल्या दोन्ही प्रेयसींसोबत रिओ दी जिनेरो इथे असणाऱ्या एका आलिशान मेंशनमध्ये राहात होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)