माझ्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस : मॅराडोना

मोस्को : रशियात फिफा विश्वचषकाचा रंग वाढतच चालला असताना मंगळवारी अर्जेन्टिना विरुद्ध नायजेरिया सामन्यानंतर एक धक्कादायक अफवा सोशल मीडियावर पसरली. ती अफवा दुसरी तिसरी कोणाची नसून अर्जेन्टिनाचे महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांच्या मरणाची होती. डिएगो मॅराडोना यांचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाल्याची पोस्ट व्हायरल झाली.

अर्जेन्टिना विरुद्ध नायजेरिया सामन्यानंतर मॅराडोना आजारी पडल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर त्यांचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले. ही बातमी समजताच मॅराडोना यांनी आपण ठणठणीत असल्याचे सांगितले. तसेच ‘मृत्यूची अफवा पसरवणाऱ्याची माहिती देणाऱ्यास दहा हजार डॉलर बक्षीस दिले जाईल’, असे त्यांनी जाहीर केले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मॅराडोना पुढे म्हणाले की, काही लोक माझ्यावर जळतात म्हणून ते माझ्या तब्येतीबद्दल वाढवून सांगतात. मला संपूर्ण जगाला सांगायचे आहे की मी जिवंत असून पूर्वीपेक्षा जास्त जीवनाचा आनंद लुटत आहे. ‘जो कोणीही मृत्यूची अफवा पसरवणाऱ्याची माहिती देईल त्याला 10 हजार डॉलर म्हणजेच 7 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल’ असे मॅराडोना यांच्या वकिलांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)