माझ्या पुस्तकांचे सर्वधिक वाचक हे महाराष्ट्रातील आहेत याचा विशेष आनंद- सुधा मूर्ती

कोल्हापूर – कोल्हापूरशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. माझी पहिली अक्षर ओळख ही कोल्हापुरातून मराठीत झाली आहे. देशभरात अनेक भाषांमध्ये माझी पुस्तक अनुवादित केली जातात. मात्र त्यामध्ये सर्वधिक वाचक हे महाराष्ट्रातील आहेत याचा विशेष आनंद आहे. अशा भावना लेखिका सुधा मूर्ती यांनी कोल्हापुरात व्यक्त केल्या.

मेहता पब्लिकेशन हाऊस ने प्रकाशित केलेल्या सुधा मूर्ती यांच्या सर्पाचा सूड, तीन हजार टाके, गरुड जन्माची कथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. हा प्रकाशन सोहळा लेखिका सुधा मूर्ती यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध अनुवादिका लीना सोहनी , जेष्ठ लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे आणि अनिल मेहता यांच्या उपस्थितीत पार पडला.

या सोहळ्यात बोलतांना सुधा मूर्ती यांनी कोल्हापूर पासून सुरू झालेला प्रवास आणि आज मिळलेल्या यशाबद्दलच्या अनेक आठवणी वाचकांच्या समोर मांडल्या.कोल्हापूरशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. माझी पहिली अक्षर ओळख ही कोल्हापुरातून मराठीत झाली आहे. देशभारत अनेक भाषांमध्ये माझी पुस्तक अनुवादित केली जातात. मात्र त्यामध्ये सर्वधिक वाचक हे महाराष्ट्रातील आहेत याचा विशेष आनंद आहे. अशा भावना  मूर्ती यांनी यावेळी व्यक्त केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
157 :thumbsup: Thumbs up
9 :heart: Love
1 :joy: Joy
4 :heart_eyes: Awesome
33 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)