माझ्या पिढीची जबाबदारी…

कोकण, भारताची पश्चिम किनारपट्टी म्हणजे सागरकिनारा एकिकडे तर त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात खूप आतपर्यंत गावं वसली आहेत. लहान होते तेव्हा पुण्यातून उठून उन्हाळ्यात सुटीसाठी गावी जाताना आपण कोकणातले आहोत याचा भलताच गर्व असायचा. आजूबाजूच्या लोकांना परतताना काजू, फणस, आंबे भरून घेऊन येणारे आम्ही हा कौतुकाचा विषय असायचा. आम्ही सुटीत किती टोपल्या आंबे संपवले याच्या गोष्टी सांगायचो. मजा असायची एकदम.

माझा पाठला भाऊ कळत्या वयात येईपर्यंत आम्ही गावी जाऊन राहिलो. त्यामुळे आमच्यासारख्या कौतुकाचा अनुभव त्याला काही मिळाला नाही. उलट आला गेला पै-पाहुणा आणि कोकण आपले गाव म्हणणारे पाहुणे सारखेच असतात. त्यामुळे नाही म्हटलं तरी तो वैतागत असणार.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी परत शहरातून शहराकडे व्हाया कोकणातील घरात राहून आलेले. समाजमाध्यमातील व्यक्त होण्यापलीकडे आपल्या खाद्यसंस्कृतीची ओळख देणारी मी परत कोणासाठी कौतुक तर मित्र लोकांची नाराजी ओढवून घेणारी. अभिमानाने सांगावे असे आज असलेले कोकणातल्या गावाची एका बाजूला होत जाणारी वाताहत बघत आम्ही नोकरदार म्हणून हतबल बसून चालेल का? माझ्यासाठी माझे उत्तर नाही असे आहे.

गाव संस्कृतीत राहण्याचे सुख आणि गाव सुटीच्या, सणाच्या दिवसात असणारी आमची ही शेवटची पिढी ठरू नये यासाठी आज आम्हाला थोडासा विरोध किंवा तुम्ही तमक्‍याच विचारांचे असा शिक्का लावून घ्यावा लागेल. पण आमच्या गावांची आज असलेली हिरवाईने व वन, वन्यजीव आणि स्थलांतरित प्राणी-पक्ष्यांचे वरदान लाभलेली ओळख कायम ठेवायला आम्हाला आज थोडा वाईटपणा आला तरी तो चालवून घ्यावा लागणार आहे. आम्ही झगडणारे, विकासाचे विरोधक जरी ठरवले गेलो तरी आम्हाला स्थलांतरित किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून आणि शहरी व गावच नसणारे लोक म्हणून कुढत आयुष्य काढण्याची गरज पडणार नाही. आम्ही आज जे करतोय त्यात कृतीबद्ध, साचेबद्ध जीवनशैली अवलंबून काम करण्यासाठी तत्पर राहण्याची गरज आहे.

कोकणात येणारे पर्यटक हे निघताना तिथे साध्या सोयी आणि संपर्क सुविधा उत्तम नसल्याचे सांगतात. आम्हाला या लहान-मोठ्या गोष्टी सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या दोन पिढ्या माहित आहेत. फक्त आम्ही कोण? तर आम्ही प्रश्नांना मोठ्या प्रश्नांची प्रत्युत्तर न देणारे वाटचाल करणारे सवंगडी आणि निसर्गसोबती आहोत इतकेच माहित आहेत.

निसर्गसंपन्न जगाला आपलं गाव म्हणजे कोकण असं स्वप्न पडावे असे एक ठिकाण जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी माझ्या पिढीवर येऊन ठाकली आहे. ती इमानेइतबारे स्वीकारणे इतकेच लहानसे स्वप्न आम्ही सध्या जगत आहोत.
वेडात दौडत खुराने माती जरी उधळली तरी गाव बेचिराख करायला टपलेले बरेच असतील याची खोल जाणीव माझ्या मनाला आहे.

कोकणाला कोकणावर प्रेम करणाऱ्या सर्वांची साथ व आपलेपणा देणाऱ्या सगळ्यांचे सहकार्य मिळत आहे. म्हणून कोकण हिरवाई संपन्न खळाळत्या निर्झरीचे कुहू ऐकणारे जागृत गाव अबाधित राहिल असा विश्वास वाटतो. होय आम्ही कोकणची माणसं. मृदू आहोत पण स्वागतशीलता राखताना फणसाच्या गोड गऱ्यासारखे माधुर्य असले तरी साळिंदराच्या काट्यासारखे एक संरक्षण कवच आम्ही राखले आहे.

– नम्रता देसाई 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)