“माझ्या नवऱ्याची बायको’ गाण्यावर प्रियंका-दीपिकाने धरला ठेका

“सुई-धागा’ चित्रपटातील अनुष्का शर्मा आणि वरूण धवन यांच्या मीम्स खूपच व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. “लय भारी’या फेसबुक पेजने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण चक्क झी मराठीवरील “माझ्या नवऱ्याची बायको’या मालिकेच्या गाण्यावर ठेका धरला आहे.

या व्हिडिओत “बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामधील “पिंगा’ गाण्यामधील काही भाग एडिट करण्यात आला आहे. दीपिका आणि प्रियंकाच्या नृत्यामधील खऱ्या गाण्याऐवजी “झी मराठी’वरील लोकप्रिय असणाऱ्या “माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचे शिर्षकगीत एडिट करण्यात आले आहे. हा व्हिडिओ “मनोज शिंगस्टे एडिटींग’ नावाच्या युट्यूब चॅनलवरील आहे.

या दोघींच्या नृत्यावर खरोखरच इतकी योग्य पद्धतीने या व्हिडिओची एडिटींग जुळवण्यात आली आहे की अनेकांनी कमेन्ट्‌समधून व्हिडिओ एडिटरची स्तुती केली आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये हा व्हिडिओला फेसबुकवर हजारो जणांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला एक लाख नव्वद हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेन्ट करुन हे एडिटींग भन्नाट झाल्याचे मत नोंदवत व्हिडिओ एडिटरची स्तुती केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)