माझ्या अविवाहित राहण्याला अजय देवगणच जबाबदार : तब्बू 

अनेक दर्जेदार चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री तब्बूच्या आयुष्यात आजही लाईफ पार्टनर म्हणून कोणीच नाही. बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे. पण 47 वर्षांची तब्बू आपल्या अविवाहित असण्याला आजही अजय देवगणला जबाबदार मानते.

तब्बूने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते, की अजय आणि माझा चुलत भाऊ समीर हे चांगले मित्र होते. माझ्यावर हे दोघेही कायम नजर ठेवून असायचे आणि मी जेथे जाईल तेथे माझा पाठलाग करायचे. मला अजयमुळे इतर मुलांशी बोलण्याचीही भीती वाटायची. त्या मुलांना तो मारण्याची धमकी द्यायचा. ते दोघेही खूप मस्तीखोर होते. काही वर्षांपूर्वी अजय आणि तब्बू एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र काही कारणाने हे समिकरण पुढे फलद्रुप होऊ शकले नाही. अजयने अभिनेत्री काजोलशी विवाह केला आणि तब्बू मात्र अविवाहितच राहिली. त्यावेळी तिने आपल्या आजही अविवाहित असण्याला अजय देवगणच जबाबदार असल्याचे तिने म्हटले होते. अजयशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जूनसोबतही तब्बूचे नाव जोडले गेले होते. मात्र, यानंतरही आज वयाच्या 47 व्या वर्षी तब्बू अविवाहित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)