माझ्यासाठी संघ अगोदर त्यानंतर सर्वकाही – हरिंदर सिंग

नवी दिल्ली: भारतीय संघाच्या सरावानंतर प्रशिक्षक हरिंदर सिंग यांनी येथील मैदानावर केलेल्या 10 फॉरवर्ड रोल ची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याबाबत स्पष्टीकरण देताना भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणाले, ती एक शिक्षा होती. आमच्या संघात कोणालाही मी, माझे बोलण्याची परवानगी नाही. आमच्यासर्वांसाठी संघग अगोदर आणि त्यानंतर सर्व काही. जर प्रशिक्षणात कोणी मी,माझे केले तर त्याला 10 पुश अप शिक्षा असते. परंतु माझ्या खांद्यात थोडी दुखापत आहे त्यामुळे मी फॉरवर्ड रोल करतो.

संघ हितासाठी ‘आम्ही’ या शब्दाचा विचार जास्त केल्यामुळे त्यातून संघ भावनेची जोपासना होती. याचा फायदा भारतीय संघाला होत आहे. यावेळी पुढे बोलताना हरिंदर सिंग म्हणाले, भारतीय संघाला मोक्‍याच्या वेळी कामगिरी उंचावण्यावर लक्ष्य केंद्रित करावे लागणार आहे. भारतीय संघाला सामना हा मर्यादित वेळेत संपवावा म्हणून नाही विशेष तयारी करत आहते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय हॉकी संघ हा आशियाई स्पर्धेत गतविजेता होता. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करून सुवर्ण जिंकणे हे ध्येय ठेवलेल्या संघाला मलेशिया विरुद्ध पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत व्हावे लागले होते. 2016मध्ये देखील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला सर्व पातळ्यांवर बरोबरीची तकार दिली होती.पण तेथेही शूट आऊटमध्ये भारताला 1-3 असे पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघाला सामना मर्यादीत वेळेत संपवून विजेयी होण्याची गरज आहे.

हरिंदर पुढे म्हणाले, जेतेच गरज आहे तेथे आम्ही आमचा सर्वात चांगला खेळ करण्याचा प्रयन्त करतोय. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आम्ही सामना मर्यादित वेळेतच संपवायला हवा होता. जकार्ता येथे आमचे लक्ष थोडे कमी झाले आणि विरोधी संघाने कुरघोडी केली. हरिंदर सिंग यांच्या प्रशिक्षणाच्या काळात भारतीय संघाने 23 सामने खेळले आहेत त्यातील 16 सामने भारताने जिंकले आहेत तर फक्त 3 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. या कामगिरीवर बोलताना ते म्हणाले, विजयाची संख्या महत्वाची नाही. आम्हाला मोठे सामने जिंकण्याची गरज आहे. सामन्यात कमीतकमी चुका करण्याकडे आमचा कल आहे. जर मोठ्या सामन्यात जर तुम्ही एकही चूक कराल तर त्याचा फटका पूर्ण संघाला बसतो आणि विजेतेपद हातून निसटते. भारतीय संघात नवोदित खेळाडूंचा अधिक भरणा असल्याने भारतीय संघ कमी अनुभव असूनही सांघीक कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)