माझे आणि जसलीनचे नाते केवळ बिग बॉस पुरतेच – अनुप जलोटा 

भजन गायक अनुप जलोटा आणि २६ वर्षीय जसलीन मथारू यांच्या जोडीमुळे बिग बॉसची चर्चा चांगलीच रंगली होती. नेटकऱ्यांनीही त्यांना चांगलेच ट्रोल केले होते. परंतु, आज अखेर ही जोडी वेगळी झाली. अनुप जलोटा हे बिग बॉसच्या घराबाहेर गेले आहेत. मात्र अनुप जलोटांनी घराबाहेर येऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझे आणि जसलीनचे नाते केवळ बिग बॉस पुरतेच होते. आमचे नाते हा तर बिग बॉसचाच प्लॅन होता, असा खुलासा अनुप जलोटा यांनी केला आहे.

अनुप जलोटा म्हणाले कि, जसलीनला बिग बॉसची ऑफर आली होती. तिने मला फोन करून सोबत येणार का? विचारले. कारण हा सिझन जोड्यांचा होता. परंतु, माझ्याकडे अनेक कार्यक्रम असल्याने मी नकार दिला. यानंतर जसलीनच्या वडिलांचा फोन मला आला. त्यांनी विनंती केल्याने मी होकार दिला. गुरु आणि शिष्य बनूनच या शोमध्ये सहभागी होण्याचे मी आणि जसलीनने ठरवले होते. परंतु, बिग बॉसतर्फे आम्हाला सांगण्यात आले कि, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगावे. यामुळे शोचा टीआरपी वाढेल, असे जलोटा यांनी सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

?shocking confession by anup..Anup and Jasleen were never in relationship with each other #anupjalota #jasleenmatharu

A post shared by Bollywood songs (@bollywood_tellywoodfanatic) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, अनुप जलोटा बिग बॉसमधून बाहेर पडल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)