माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला – मिताली राज 

नवी दिल्ली: भारताची अनुभवी महिला खेळाडू मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवार आणि कार्यकारणी समिती सदस्य डायना एडल्जी यांच्यावर तिची कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला असून तिने हा आरोप बीसीसीआयचे सचिव राहुल जोहरी आणि व्यवस्थापक साबा करिम यांना केलेल्या एका मेल मध्ये केले आहेत. त्यामुळे सध्या भारतीय महिला क्रिकेट सध्या अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे.

मितालीला संघाबाहेर ठेवण्यात आल्यावर जो वाद होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआयच्या उच्चपदस्थांनी बैठकीत मितालीशी चर्चा केली. त्यानंतर मितालीने त्यांना केलेल्या ईमेलमध्ये मितालीने डायना एडल्जी आणि रमेश पोवार यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये तिने लिहल्याचे समजते की, मी खूप तणावात असून मला काहीतरी गमावल्यासारखे जाणवत आहे. मी देशासाठी दिलेल्या योगदानाचे काही अधिकाऱ्यांना काहीही वाटत नाही. ते माझी कारकीर्द संपवण्याचा आणि माझा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे मितालीने त्यात लिहले आहे की, मी एडल्जी यांचा सन्मान करते. परंतु, त्यांनी माझ्या सोबत काय घडले आहे याचा विचार न करता मला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. कार्यकारणी समिती सदस्य म्हणून त्यांचे असे वागणे घृणास्पद आहे. भारतीय महिला प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर आरोप करताना मितालीले लिहले आहे, वेस्ट इंडिजमध्ये उतरल्यापासून प्रशिक्षकांच्या वागण्यात बदल झाला होता. प्रथम छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांचा तिरस्कार जाणवत होता. त्यामुळे माझ्यावरील मानसिक तणाव वाढला होता.

मी आसपास असेल तर ते त्या जागेतून निघून जात असत. अन्य खेळाडूंचा सराव ते पाहत असत पण मी जेव्हा फलंदाजीचा सराव करण्यास येत असे त्यावेळी ते त्या ठिकाणावरुन निघून जाणे पसंत करत. या सर्व घटनानंतर मी संघ व्यवस्थापकांची भेट घेतली आणि त्याच्या समोर माझी कैफियत मांडली. या भेटीनंतर प्रशिक्षकांच्या वागण्यात अधिकच बदल झाला आणि ते माझ्याशी अधिकच तिरस्काराने वागू लागले होते. त्यांच्यासाठी मी संघातील सदस्यच नसल्या सारखे ते वागत होते. त्यातच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याच्या वेळी त्यांनी मला मैदानात न येण्याच्या सुचना देखिल केल्या होत्या. त्यावेळी ते मला म्हणाले की तू मैदानात येऊ नकोस त्या ठिकाणी माध्यमांचे प्रतिनीधी असतील. मला त्यांच्या म्हणन्याचा अर्थ त्या वेळी समजला नव्हता. कारण ते मला माझ्या संघा सोबतच रहाण्यास विरोध करत होते आनि ते ही एका महत्वाच्या सामन्यापूर्वी ते असे का वागत आहेत हेच मला समजले नाहे. असा आरोपही तिने यावेळी पोवार यांच्यावर केला.

बीसीसीआयच्या उचपदस्थांनी घेतली मिताली आणि हरमनप्रीतची भेट 

भारतीय टी- 20 महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज यांनी भारतीय क्रिकेट नियम मंडळाचे (बीसीसीआय) सचिव राहुल जोहरी आणि व्यवस्थापक सबा करीम यांची भेट घेतली आहे. मिताली राजला टी- 20 विश्वचषकात इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तंदुरुस्त असूनही संघात घेतले नाही आणि भारतीय संघाला तो सामना गमावल्याने स्पर्धेतुन गाशा गुंडाळावा लागल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या भेटी याच वादग्रस्त विषयाशी निगडीत झाली आहे.

भारतीय महिला संघाच्या या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट ही वयक्तिक स्वरुपात घेतली आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघाची व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्या यांना देखील बीसीसीआयच्या या अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. यांनी या सर्व बैठकांच्या वेळी विशेष नोंदी घेतल्या आहेत. त्यांचा एक अवहाल तयार ते बीसीसीआयच्या कार्यकारणीसमितीकडे सुपूर्त करणार आहेत. या बाबत प्रश्न विचारले असता जोहरी म्हणाले, हे सत्य आहे की आम्ही त्यांच्यासह बैठकी केल्या आहेत. त्या प्रत्येकीने त्याचे म्हणणे आमच्यासमोर मांडले आहे. आम्ही त्याचे म्हणणे लिहूनही घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)