‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी 120 प्रस्ताव

पुणे- मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेनुसार माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजनेला सुरूवात करण्यात आली. या योजनेला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या 120 लाभार्थींना अनुदान दिले जाणार आहे.

“माझी कन्या भाग्यश्री’ योजनेअंतर्गत जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने 2017-18 मध्ये लाभार्थींची निवड केली आहे. त्यामध्ये दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थींची संख्या 114 आहे. तर एका मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाची संख्या 6 आहे. संबंधित 114 कुटुंबीयांना प्रत्येकी 25 हजार आणि सहा कुटुंबीयांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी 31 लाख 50 हजारांची वितरीत केले जाणार आहे. दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाची सर्वाधिक 32 संख्या जुन्नरमध्ये आहे.

तर खेडमध्ये 24, आंबेगावात 24 आहे. दरम्यान 2016-17 मध्ये जुन्या “माझी कन्या भाग्यश्री’ योजनेनुसार जिल्ह्यातील 467 लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी मातेचे बॅंकेत संयुक्त खाते आवश्‍यक आहे. तसेच मुलींच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय बॅंकेतील अनुदानाची रक्कम काढता येणार नाही. मात्र, दर सहा वर्षांनी अनुदानावरील व्याज काढण्याची परवानगी कुटुंबाला देण्यात आली आहे.

लवकरच अनुदानाचे वितरण
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान जाहीर केले आहे. मात्र, वंशाचा दिवा असावा अशा मानसिकतेखाली असणाऱ्या कुटुंबांनी एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केलेल्या कुटुंबाची संख्या जिल्ह्यात अवघी सहा आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास 50 हजार, तर दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केल्यास 25 हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील 120 लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदानाचे वितरण केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)