माझा पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी- हनुमंत बंडगर.

भिगवण- मदनवाडी येथील धनबाबा मंदिर याठिकाणी हायमॉस्ट दिवा बसविल्याने चार दिव्यांच्या प्रकाशाने येथील परिसर प्रकाशमय झाला आहे. माझ्या पदाचा वापर सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केले. धनबाबा देवस्थानच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य तुकाराम बंडगर, सरपंच कुंडलिक बंडगर, चेअरमन विष्णुपंत देवकाते, उपाध्यक्ष धनंजय थोरात, पत्रकार दादासाहेब थोरात, दत्तात्रेय थोरात, संचालक अशोक वनवे, बंडगर, ग्रामपंचायत सदस्य तेजस देवकाते, सतीश बंडगर, हनुमंत थोरात, सतीश शिंगाडे, नानासाहेब बंडगर, योगेश बंडगर, वैष्णवी हॉटेलचे मालक दादा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. बंडगर म्हणाले की, माझ्या जिल्हा परिषद गटात तालुक्‍यातील आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा परिषदेच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत. लोकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)