माजी हवाईदल प्रमुख त्यागींना जामीन

ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरण
नवी दिल्ली – ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना दिल्लीच्या न्यायालयाने जामीन मंजुर केला. त्यागी आणि त्यांच्या भाच्यांची प्रत्येकी एक लाख रूपयांच्या जामीनावर कोर्टाने आज सुटका केली. त्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते त्यानुसार ते कोटापुढे हजर झाल्यानंतर त्यांना हे जामीन मंजुर करण्यात आले.

तथापी आजच्या सुनावणीला उपस्थित न राहणारे इटालियन मध्यस्थ कार्लो गेरोसा, गुईडो हॅसचके आणि दुबईतील भारतीय व्यावसायिक राजीव सक्‍सेना यांच्या विरोधात मात्र अजामीनपात्र अटक वॉरंट न्यायालयाने जारी केले आहे. या खटलच्या प्रकरणात या सहा जणांखेरीज कोर्टाने एकूण 28 भारतीय व विदेशी नागरीकांना समन्स जारी केले आहेत. या प्रकरणात लाच म्हणून दिली गेलेली रक्कम वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांच्या नावाने विदेशातील बॅंकांमध्ये ट्रान्स्फर करण्यात आली आहे त्याविषयीचे सज्जड पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सीबीआयने केल आहे.

अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर मध्ये एकूण 423 कोटी रूपयांची लाच दिली गेली आहे असे सीबीआयचे म्हणणे आहे आणि यात थेट माजी हवाईदल प्रमुख आणि त्यांचे नातेवाईकच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजकीय क्षेत्रात हा घोटाळा खूप गाजला असला तरी त्यात राजकीय क्षेत्रातील कोणीही व्यक्ती दोषी असल्याचे आढळून आलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)