माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेचे राज्यव्यापी शिबीर

सातारा – निवडणुका आल्या की सर्वच पक्षाचे नेते संघटनेच्या पाठिंब्यासाठी भेटायला येतात. पण जे नेते सैनिकांचे काम करतील त्यांच्याच पाठीशी सैनिकांनी रहावे, असे आवाहन महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम यांनी केले.

संघटनेचे राज्यव्यापी चिंतन शिबिर सातारा येथे नुकतेच पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. कॅप्टन निकम म्हणाले, अनेक पक्षांच्या नेत्यांनी यापूर्वीही महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेची ताकद आजमावली आहे. ज्या-ज्या मतदार संघात संघटनेने पाठिंबा दिला तो उमेदवार निवडून आलेला आहे, हे सर्वश्रुत आहे. संघटनेची ताकद आणि एकी ही देशभरात माहित असल्यानेच वन रॅंक वन पेन्शन मागणीच्या दबाव मेळाव्याची जबाबदारी आपल्या संघटनेवर टाकली होती.

त्या मेळाव्यास जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे उपस्थित होते. माइया नेतृत्वाखाली दबाब मेळावा स्वराज सातारा येथे होऊन काही दिवसातच केंद्र शासनाने 36 वर्षे प्रलंबित असलेली वन रॅंक वन पेन्शनची मागणी मान्य केली. वन रॅंक वन पेन्शनची मूळ मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कर्नल आर. डी. निकम व कर्नल इंद्रजितसिंग यांची होती. संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे कॅप्टन निकम यांनी सांगितले.

कार्यक्रमास सरस्वती सैनिक महिला बचत गटाच्या प्रर्वतिका पुष्पा निकम, कमांडंट तानाजी पवार, कर्नल अरूण जाधव, कर्नल सयाजीराव निकम, सुवर्णा निकम, महाराष्ट्रातून संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच जिल्हयातील संघटनेचे कार्यकर्ते, गण, गट अधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार जयवंत गुजर यांच्या निबंधास राज्यपातळीवरचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. चिंतन शिबिरामध्ये अनेक सैनिकांनी उस्फूर्तपणे आपले विचार मांडले. प्रास्ताविक कॅप्टन गोपाळ गायकवाड यांनी केले. सुभेदार मेजर श्रीमंतराज शिंदे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)