माजी सैनिक बक्षिसापासून 40 वर्षे वंचीत

हायकोर्टात घेतली धाव : याचिकेवर उद्या सुनावणी
मुंबई – भारत-पाकिस्तानच्या 1965 आणि 1971च्या युध्दात विशेष कामगिरी केल्याचे बक्षीस मिळालेला माजी सैनिकाला हे बक्षिस मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुन कृष्णा कागले (वय 72) या माजी सैनिकाच्या वतीने ऍड. धैर्यशिल सुतार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सोमवार, दि. 10 सप्टेंबर रोजी सुनावणी अपेक्षीत आहे. गेली चाळीस वर्षे सरकार दरबारी पायपीट केल्यानंतर आतातरी न्याय मिळेल, अशी आशा या माजी सैनिकाला वाटते आहे.

ऐन उमेदीच्या काळात देश सेवेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील यळगुड गावचे मूळ रहिवासी असलेल्या अर्जून कागले यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. सन 1964मध्ये ते सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले. आणि अवघ्या एका वर्षातच 1965 आणि 1972च्या भारत-पाकिस्तान युध्दात त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. त्यांना राजस्थानमध्ये 15 बिघा (सुमारे साडेसात एकर) जमीन मंजूर करण्यात आली.

दरम्यान, 1977 मध्ये ते सेवा निवृत्त झाल्याने तेथेच राजस्थानमध्येच आपल्या कुटूंबासह स्थायीक झाले. आणि जमीनीचा पाठपुरावा करण्यास सुरूवात केली. सुमारे 38 वर्षानंतर 2016 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी राजस्थान येथील कोटा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अर्जुन कृष्णा कागले हे राजस्थानचे नाहीत तर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील यळगुड गावचे मूळ रहिवासी असल्याचा साक्षात्कार झाला. तसेच पत्र कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कागले यांना कोल्हापूर जिल्ह्यात जमीन देण्यात यावी, असे कळविले.

त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कागले यांना प्रथम कागल शहराच्या जवळची जमीन देण्याचीही तयारी दाखवली. जमीन देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना सदर जमीन म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल योजनेसाठी ही जमीन राखीव करण्यात आल्याने ती रद्द करण्यात आली. त्यानंतर शेतीसाठी योग्य अशी शाहुवाडी तालुक्‍यातील जमीन देऊ केली. पण ती सुद्धा देता येत नसल्याचे नंतर स्पष्ट केले. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारीही थंड पडले. कागले यांची फाईल पुन्हा लालफितीत अडकली. अखेर कागले यांनी ऍड. धैर्यशिल सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)