माजी सैनिकांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरविणारे डॉ. आठरे यांचा गौरव

नगर – माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना एसी.एच.एस.च्या माध्यमातून उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरविणारे डॉ. अनिल आठरे पाटिल यांचा शहीद दिनानिमित्त जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने तिरंगा ध्वज देऊन गौरव करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, खजिनदार भाऊसाहेब कर्पे, सचिव जगन्नाथ जावळे, सह. सचिव निवृत्ती भाबड, विश्‍वस्त संतोष मगर, डॉ. अतुल शेटे, लखन जाधव आदी उपस्थित होते.
प्रारंभी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात भाऊसाहेब कर्पे यांनी फाउंडेशनच्या वतीने माजी सैनिकांनी आपल्या पेन्शनच्या वर्गणीतून राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. शिवाजी पालवे म्हणाले, प्राणाची बाजी लावून सीमेवर देशसेवा करुन निवृत्त झालेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरविणारे डॉ. आठरे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. जवान हे सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेले असतात. आरोग्य सुविधा खर्चिक असल्याने ते मध्यम कुटुंबीयांना परवडत नाही. त्यांना एसी.एच.एस.च्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा पुरविण्याचे काम या डॉ. आठरे यांच्या वतीने चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. आठरे म्हणाले, केलेल्या कामाची दखल घेऊन, माजी सैनिकांनी केलेल्या सत्काराने भारावलो आहे. सैनिकांविषयी पूर्वी पासूनच मनात आदर आहे. सेनेमध्ये पायलट होण्याची मनापासून इच्छा होती. मात्र, नंतर काही कारणास्तव वैद्यकिय क्षेत्राकडे वळलो असलो तरी त्यांना आपल्या माध्यमातून देवा देण्याचे काम चालू ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच भविष्यात आजी-माजी सैनिकांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबिर घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)