माजी सैनिकांचे प्रश्‍न संसदेत उपस्थित करणार – कॉंग्रेस

नवी दिल्ली  – माजी सैनिकांचे प्रलंबीत प्रश्‍न संसदेत उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे कॉंग्रेसने म्हटले आहे. सेवानिवृत्त सैनिंकांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतन लाभात सरकारने कपात केली असल्याची माजी सैनिकांची तक्रार आहे. त्याविषयी आम्ही संसदेच्या चालू अधिवेशनात सरकारला आम्ही जाब विचारू आणि त्यांचा विषय संसदेत उपस्थित करणे ही प्रमुख विरोधक म्हणून आमची जबाबदारीच आहे असे कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या सुमित्रा देव यांनी म्हटले आहे.

माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी सैनिकांच्या प्रश्‍नांची पत्रकारांना माहिती दिली. माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की गेल्या तीन वर्षात आमच्या निवृत्ती विषयक लाभांना पद्धतशीरपणे कात्री लावली गेली आहे. वन रॅंक वन पेन्शन योजनेतील आमच्या तक्रारींवर अजून निर्णय घेतला गेलेला नाही असे त्यांनी नमूद केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)