माजी सैनिकांचा उद्या मेळावा

मंचर- आंबेगाव आणि जुन्नर तालुक्‍यातील माजी सैनिकांचा मेळावा मंचर येथील गणराज मंगल कार्यालयामध्ये बुधवारी (दि. 30) आयोजित केला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष रविंद्र थोरात यांनी दिली. अभिलेख कार्यालयात प्रतिनिधीद्वारे पेंशन संबंधित समस्या सोडविणे, कागदपत्राची नोंद अद्यावत करणे, ई.सी.एच.एस. नवीन कार्ड बनविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे, पेंशन संबंधित कागदपत्राची पुर्तता करणे, विविध वित्तीय संस्थांमध्ये आणि राष्ट्रीय बॅंकाच्या समावेशासह माजी सैनिकांना विविध योजनांविषयी जागरुक करणे, जिल्हा सैनिक बोर्डाच्या अंतर्गत नोंदणीचे रेकॉर्डविषयी सल्ला देणे, प्रशासनाच्या मदतीने आधारकार्ड बनविणे, कुटुंबाच्या सोयीसाठी चालविण्यात येणाऱ्या आर्मी कल्याण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक संस्थाविषयी माहिती देणे, वेटरन पोर्टल वेबसाईट द्वारे माजी सैनिकांची नोंदणी करणे, जीवनप्रमाणपत्र बनविणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी सैनिक संघाचे सचिव यशवंत गांजाळे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)