माजी सरपंचावरील हल्लेखोरास दोन दिवसांची पोलीस कोठडी

पाटण – माजी सरपंचावर कोयत्याने वार करून प्राणघातकी हल्ला केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या भीमराव सिताराम देवकांत (वय 55) यास अटक करून मंगळवारी पाटण न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

याबाबत आधिक माहिती अशी, सोमवारी पाटणच्या आठवडा बाजारादिवशी शहरातील लायब्ररी चौकात टोळेवाडीचे माजी सरपंच नारायण गणपत डिगे 61 हे सायंकाळी 6 वाजता चालत निघाले होते. त्यावेळी त्यांच्यावर टोळेवाडीतीलच भीमराव देवकांत याने कोयत्याने वार केले. डोक्‍यात दोन वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या नारायण डिगे यांना उपचारार्थ कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी सरपंच नारायण डिगे यांच्यावर गावातील मान पान न मिळाल्याचा राग मनात धरून हल्ला केल्याचे देवकांत यांनी पोलिसांना सांगितले. त्याला पाटण न्यायालयात मंगळवारी हजर केले असताना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)