माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या स्मृतींना उजाळा

वडूज : हुतात्मा परशुराम विद्यालयामधील 1985-86 च्या इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.

निवृत्त शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना
जुन्या विद्यार्थ्यांसह शिक्षक हि गहिवरले
वडूज, दि. 20 (प्रतिनिधी) – हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूजच्या 1985-86 सालाच्या इयत्ता 10 वी च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने समाधान लाभल्याचे माजी विद्यार्थ्यांसह निवृत्त शिक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते. या स्नेह मेळाव्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत गेल्याचा सुखद अनुभव दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थी हणमंत खुडे यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने शाल-श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुनील बोडरे, अशोक राऊत, शंकर पाटोळे, शुभांगी खडके, सुरेखा काटकर, स्वाती येवले, मोनिका गांधी, मंजुषा येवले, वनिता गोरे आदींनी जुन्या आठवणी ताज्या करत शिक्षकांबद्दल कृतज्ञता भाव मनोगताद्वारे व्यक्त केला.
यावेळी माजी शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांसमवेत झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत गेल्याचा सुखद अनुभव दिला. भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू, ओठावर हासू व मनात अभिमानाची भावना जागविलेलेली होती याप्रसंगी माजी प्राचार्य पोपटराव राऊत, चंद्रकांत जाधव, प्रतापराव काळे, सुधाकर भांडारे, शशिकांत जोशी, शरद भंडारे, प्रतापराव काळे, सुधाकर भंडारे यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी आडेकर यांचा गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. तर उपस्थित माजी विद्यार्थी यांची वाहवा मिळवली.
यावेळी आर्मीमध्ये असणारे संजय मोहिते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर दुपारी स्नेहभोजनानंतर गप्पा गोष्टी झाल्या. तसेच माजी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही पार पडला. शैक्षणिक काळातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्यातील संवादामुळे त्यावेळेस घडलेले विनोद व आलेले अनुभव विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी व्यक्त करून भूतकाळातील स्मृती जागृक केल्या. त्यामुळे सर्वजण विद्यार्थी दशेत गेल्याचा आभास निर्माण झाला. असे कार्यक्रम झाले तरच जीवनातील खरा आनंद उपभोगल्याचे समाधान लाभेल अशा भावना ही निवृत्त शिक्षकांमधून यावेळी उमटल्या.
कार्यक्रमाचे संयोजन मनोज पंडित, संजय लावंड, दत्तात्रय कुंभार, ज्ञानेश्वर खुस्पे, अजय भोकरे, महेश भांडारे, डॉ बेंद्रे, शोभा गुरव, कल्पना गोडसे, सूर्यकांत गोरड, जितेंद्र जोशी, उपप्राचार्य देशमुख, सुनिल राऊत, राजेंद्र गाढवे आदींनी परिश्रम घेतले.

सोशल मीडियामुळे जुन्या मित्रांची भेट…..!
शाळेतील माजी विद्यार्थी व्यवसाय, नोकरी निमित्त, लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या देवाण-घेवणामुळे फेसबुक, व्हॉटसऍपच्या मदतीने एकत्र येतात आणि नवीन ग्रुप तयार होतो. त्यामुळे अशा आशयाचे नवनवीन उपक्रम साजरे होत असतात. मोबाईलमुळे लांब असलेली माणसे जवळ येतात. मग जग जवळ येत आहे, अशा भावनाही व्यक्त होतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)