माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा

पिंपरी – पुनवळे येथील प्राथमिक विद्या मंदिरातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला घडविलेल्या शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याने शिक्षक भारावले.

या विद्यार्थ्यांनी आम्हाला उपकृत केले, असे उद्‌गार ज्येष्ठ शिक्षक पोपटराव पाटील यांनी काढले. तर आजवर मिळालेल्या पुरस्कारापेक्षा हा सर्वोच्च सन्मान असल्याचे शिक्षिका नंदा ढवळे यांनी नमूद केले. ज्योती तापकीर, बेबी मुसुडगे, दिलखुश माळी या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. पद्‌माकर जोशी, मंदाकिनी चव्हाण, अलका गायकवाड, सविता कराळे, रेखा खैरे आदी शिक्षक उपस्थित होते.

विनायक ताजणे यांनी प्रास्ताविक केले. गोकुळ दर्शेले यांनी आभार मानले. हिरामण गवारे, सतिश बोरगे, शिवाजी बांदल, किशोर बांदल, नवनाथ दर्शेले, अमर ताजणे, राजु केंजळे, अतुल बोरगे, गोरक्ष काळे, प्रमोद ओव्हाळ, अजित शिंदे, सुनील बांदल, मल्हारी बोरगे, नाना बोरगे, प्रमोद पांचाळ, प्रवीण पिंगळे, समाधान देवकर, नितीन दर्शेले, प्रेमकुमार कलकुंतला यांनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)