माजी विद्यार्थ्यांकडून कोथळे विद्यालयाला अडीच लाखांची मदत

जेजुरी- पुरंदर तालुक्‍यातील कोथळे येथील श्री मल्हार शिक्षण मंडळाच्या विद्या महामंडळ प्रशाला विद्यालयातील 1990 ते 2000 या सालातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारतीसाठी अडीच लाख रुपयांची मदत केली. कोथळे येथे 1986 साली सुरु करण्यात आलेल्या विद्यालयाने शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण केला आहे. या उपक्रमशील शाळेला नुकताच जिल्हास्तरीय उपक्रमशील शाळेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, सचिव शंकर जगताप, कोषाध्यक्षा चंद्रलेखा जगताप, पी. एम. जगताप, राजाभाऊ जगताप, रामदास जगताप समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या भौतिक सुविधा व इमारतीसाठी वर्गणी जमा करून सुमारे अडीच लाख रुपयांचा निधी संस्थेकडे सुपूर्द केला. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन राउत यांनी केले तर आभार एकनाथ देवकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)