माजी राज्यपाल दिनेश नंदन सहाय यांचे निधन

पाटणा – छत्तीसगड आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल दिनेश नंदन सहाय यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. सहाय यांनी भारतीय पोलिस सेवेत कार्य केले आहे. ते बिहारचे पोलिस महासंचालक होते. पोलिस सेवेतील निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करताना समता पार्टीत प्रवेश केला होता.

त्यानंतर त्यांची छत्तीसगडचे पहिले राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2003 साली त्यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेथे ते 2009 पर्यंत पदावर कार्यरत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)