माजी मिस इंडिया नताशा सुरीचा इंडोनेशियात अपघात

माजी फेमिना मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा सुरी हिचा इंडोनेशियात अपघात झाला. या अपघातात नताशा गंभीर जखमी झाली आहे. ती रुग्णालयात 24 तास डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नताशा इंडोनेशियामध्ये एका लक्‍झुरिअर ब्रॅंड स्टोअरच्या लॉंच इव्हेंटसाठी गेली होती. तिने येथे बंजी जम्पिंगचा थरारक अनुभव घेण्याचे ठरवले. एका तलावावर बंजी जम्पिंग करताना तिने डोंगरकड्यावरुन झेप घेतली. मात्र दुर्दैवाने तिला बांधलेला संरक्षक दोर मध्येच तुटला आणि डोके पालथ्या अवस्थेत ती जलाशयात पडली.

नताशाने 2006 मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा किताब पटकावला होता. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अंतिम 10 स्पर्धकांमध्येही तिचा समावेश होता. 2016 मध्ये तिने ‘किंग लायर’ या मल्ल्याळम चित्रपटातून पदार्पण केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)