माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात

श्रीगोंदा – माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या वाहनाला नगर-पुणे महामार्गावरील सरदवाडी (शिरुर) जवळ भीषण अपघात झाला. मात्र बबनराव पाचपुते, चालक युवराज उबाळे व स्विय सहाय्यक योगेश भोसले हे सर्व सुखरूप बचावले. अपघात शुक्रवारी रात्री एका ट्रकला ओव्हरटेक करताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाला. पाचपुते यांना पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
शुक्रवारी पाचपुते हे वाळकी येथील डॉ. बाळासाहेब कासार यांच्या मुलीचे नगर येथील लग्न उरकून पूण्याकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजताच शिरुर परिसरातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. विचारपूस करत मदत केली. आज सकाळी बबनराव पाचपुते यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ पाठवला असून तुमच्या सर्वांच्या आशीवार्दाने अपघातातून बचावलो. आमची प्रकृती चांगली असून कोणीही काळजी करू नये’ असे म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)