माजी मंत्री अकबर यांच्यावर थेट बलात्काराचाच आरोप 

अमेरिका स्थित महिला पत्रकाराने कथन केली 23 वर्षांपुर्वीची कहाणी 

वॉशिंग्टन: अमेरिकेत सध्या एका ख्यातनाम मिडीया हाऊस मध्ये संपादक म्हणून काम करणाऱ्या महिलेने माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी 23 वर्षांपुर्वी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. त्यांनी जाहीरपणे मांडलेल्या या तक्रारीमुळे पुन्हा खळबळ माजली आहे. अकबर यांच्या वकिलांनी या महिलेचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराचे नाव पल्लवी गोगोई असे असून त्या सध्या अमेरिकेतील नॅशनल पब्लिक रेडिओ या संस्थेत मुख्य संपादक म्हणून काम करीत आहेत. वॉशिंग्टन पोस्ट या प्रख्यात दैनिकात लिहीलेल्या लेखात या महिलेने ही सारी कहाणी कथन केली आहे.

त्यांनी नमूद केले आहे की हा प्रकार घडला त्यावेळी अकबर हे एशियन एज नावाच्या दैनिकाचे संपादक होते. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून आपल्यावर ही बळजबरी केली. गेली 23 वर्षे मी हे भयानक प्रकरण माझ्या मनातच दडवून ठेवले होते. आपण स्वता या दैनिकात काम करीत असताना त्यांनी आपला कसा मानसिक आणि शारीरीक छळ केला याचा सारा तपशील त्यांनी यात सादर केला आहे. आपण ज्यावेळी एशियन एज या वृत्तपत्रात नोकरी स्वीकारली त्यावेळी आपण केवळ 22 वर्षीय होतो. त्यावेळी थेट अकबर यांच्या सारख्या महान पत्रकाराच्या हाताखाली त्यांना काम करण्याची संधी मिळाल्याने आपण सुरवातील हरखून गेलो होतो. वयाच्या 23 व्या वर्षीच आपल्याला त्या दैनिकाच्या संपाकीय पानाची जबाबदारी मिळाली पण त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागली असे त्यांनी म्हटले आहे.

1994 साली मी एकदा त्यांच्या केबीन मध्ये संपादकीय पान दाखवयला गेले होते त्यावेळी त्यांनी माझ्या कामाचे कौतुक करतानाच मला जवळ ओढून जबरदस्तीने चुंबन घेतले. त्यावेळी मला अत्यंत लाजीरवाणे वाटले त्यातून आपण उद्धवस्त झालो. पण आपण त्यावेळी गप्प राहिलो. नंतर काही महिन्यांनी अकबर यांनी आपल्याला एका मासिकाच्या प्रकाशनानिमीत्त मुंबईत बोलावून घेतले. अंकाची लेआऊट्‌स दाखवण्याच्या निमीत्त त्यांनी आपल्याला त्यांच्या ताज हॉटेल मधील खोलीत बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी तिथेही माझे जबरदस्तीने चुंबन घेतले. त्यावेळी मात्र मी त्यांना जोरदार प्रतिक्रार केला. त्यावेळी त्यांनी माझ्या तोंडावर ओरखाडे उठवले मी तेथून पळून गेले. ही बाब मी माझ्या सहकाऱ्यांनाही कथन केली. नंतर मी जेव्हा दिल्लीत परत आले त्यावेळी अकबर यांनी मला पुन्हा आपल्याला त्या कामी विरोध केला तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. नंतर जयपुरला एक स्टोरी करण्याच्या निमीत्ताने त्यांनी मला बोलावून घेतले आणि त्यांनी त्यावेळी अधिक आक्रमकपणा दाखवत माझे कपडे फाडून त्या खोलीत आपल्यावर थेट बलात्कारच केला असे त्यांनी या लेखात नमूद केले आहे. पण या घटनेविषयी मी कोणाकडेही तक्रार केली नाही कारण माझ्या तक्रारीवर कोणीच विश्‍वास ठेवला नसता. मी स्वतालाच दोष देत गप्प राहिले. त्यानंतरही त्यांचा आपल्यावरील जुलुम सुरूच राहिला. कार्यालयातील अन्य कोणा सहकाऱ्यांशी बोलायलाही त्यांना आक्षेप असायचा. पण नोकरी जाण्याच्या भीतीने मी सारा हा अत्याचार सहन केला. पण त्यांच्या या अत्याचारामुळे मी रोज थोडीथोडी मरत राहिले असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिकाच्या कामासाठी मला बक्षिस म्हणून त्यांनी अमेरिका किंवा ब्रिटन मध्ये नोकरीसाठी पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला. या मागे त्यांचा हाच डाव होता की त्या देशात मला कधीही जाऊन मला भेटता यावे व मी कोणताही प्रतिकार त्यांना करू नये. लंडन ऑफीस मधील एका पुरूष सहकाऱ्याशी बोलत असल्याचे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आपल्यावर फारच जाळ काढीत अनन्वीत अत्याचार केले असेही त्यांचे म्हणणे आहे. आज मी अमेरिकेत स्थायिक आहे. आपल्याला कुटुंब आहे. अकबर हा फार मोठा माणूस आहे कायदा त्याचे काहीही बिघडवू शकत नाही या भावनेने मी त्याने केलेले अत्याचार निमुटपणे सहन केले त्याची कोठे तक्रार दिली नाही. त्यांनी माझ्याशी जे केले त्याची किंमत त्यांना कधीच मोजावी लागणार नाही अशी भीती कायम माझ्या मनात राहिली असेही त्यांनी यात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)