माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर

नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 29 मार्च रोजी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले आहे. अशी बातमी सोशल मीडियावर पसरत आहे. या बातमीची भारतीय जनता पक्षाने पुष्टी केली असल्याचेही बातमीत सांगण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

मात्र या बातमीत काहीही तथ्य नसून ती केवळ एक अफवा आहे, आणि त्यावर कोणी विश्‍वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची अफवा यापूर्वीही पसरली होती. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलाकांत दास यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची माहिती दिली होती. त्यानंतर त्या भागातील अनेक शाळांना सुटी देण्यात आली. ही गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्यानंतर सत्य उघड होऊन अफवा पसरवणाऱ्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले होते.

अटल बिहारी वाजपेयी स्मृतिभ्रंशाने आजारी असून सन 2009 पासून ते व्हीलचेयरवर आहेत. अलीकडेच भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)