माजी न्यायाधीशांच्या नावे 2200 मोटरगाड्या ; पाकिस्तानमध्ये खळबळ 

इस्लामाबाद (पाकिस्तान): पाकिस्तानच्या एका माजी न्यायाधीशांच्या नावावर 2200 मोटरगाड्यांची नोंद असल्याची खबर आली आहे. या माजी न्यायाधीशांचे नाव सिकंदर हयात असून त्यांच्या नावावर 2200 मोटरगाड्यांची आरटीओत नोंदणी झालेली असल्याच्या बातमीने पाकिस्तान मोठी खळबळ माजली आहे. मात्र माजी न्यायाधीश सिकंदर हयात यांच्या वकिलाने त्याबाबत वेगळाच खुलासा केला आहे.

आपले अशील सिकंदर हयात यांनी आजवर फक्त एकच मोटर कार खरेदी केल्याची माहिती वकील मियांजफर यांनी दिली आहे. मियांजफर यांनी स्रवोच्च न्यायालयाला सांगितले, की मासे अशील माजी न्यायाधीश सिकंदर हयात यांनी आजवर एकच मोटरव्‌ कार खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नावावर आरटीओचे एके चलन आले होते. त्यांच्या कारने वाहतुकीचे नियम मोडल्याचा उल्लेख त्यात होता. पण ज्या मोटर कारचा क्रमांक देण्यात आले होते, ती कार सिकंदर हयात यांनी खरेदी केलेली नव्हती,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंजाब अबकारी आणि कर विभागाने दिलेल्या माहितीवरून सिकंदर हयात हे 2224 नोंदणीकृत मोटर गाड्यांचे मालक असल्याचे दिसून आले होते. या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात अहवाल मागितला आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या बेनामी संपत्तीचा मामला जोरात चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)