माजी नगरसेवकाच्या मुलावर वार

पिंपरी – भावाला होणारी मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर तीन जणांनी कोयत्याने वार केले. ही घटना थेरगावातील पवारनगरमध्ये घडली. याप्रकरणी एका आरोपीला वाकड पोलिसांनी गजाआड केले आहे.

कुणाल संपत पवार (वय-20, रा. पवारनगर, थेरगाव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. रवी भिलारे (वय-30, रा. गुजरनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कुणाल हा शिवसेनेचे माजी नगरसेवक संपत पवार यांचा मुलगा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोपी रवी हा गुंड प्रवृत्तीचा आहे. काही दिवसांपूर्वी रवी याने कुणालचा भाऊ कुंदन याच्या मित्राला मारहाण केली होती. 25 जानेवारी रोजी लक्ष्मीबाई गार्डनजवळ कुंदन याने आरोपी रवी याला मित्राला मारहाण केल्याबद्दल जाब विचारला. मात्र, आरोपी रवीला जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने कुंदनला मारहाण सुरू केली. भावाला मारहाण होत असल्याचे समजताच कुणालने धाव घेतली. यावेळी आरोपींनी कुणालच्या डोक्‍यात कोयत्याने वार केला आणि बेदम मारहाण केली. वाकड ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करत आहेत.

कायदा – सुव्यवस्थेचे धिंडवडे  
चोऱ्या, हाणामाऱ्यांचे सत्र सातत्याने सुरू आहे. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नाही. आपल्या मुलावर हल्ला केलेला रवी भिलारे हा आरोपी गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच एका तरूणाच्या डोक्‍यात दगड घातला होता. मात्र, त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई न केल्यामुळे त्याची मजल कोयत्याने वार करण्यापर्यंत गेली. पोलिसांनी आताही त्याच्यावर केवळ गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याऐवजी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक संपत पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)