माजी खासदार अणि आरजेडी नेते प्रभुनाथ सिंह खुनाच्या आरोपात दोषी

रांची (झारखंड)-माजी खासदार आणि आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) चे नेते प्रभुनाथ सिंह खुनाच्या आरोपात दोषी असल्याचा निर्णय झारखंडमधील न्यायालयाने आज दिला आहे. 22 वर्षांपूर्वीच्या खुनाच्या खटल्याचा निकाल देताना हजारीबाग जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा आणि सेशन न्यायाधीशांनी प्रभुनाथ सिंह, त्यांचे बंधू दिनानाथ सिंह आणि रितेश सिंह यांना दोषी ठरवले आहे. बिहारमधील मशरक लोकसभा मतदारसंघातून 1995 साली निवडून आलेले अशोक सिंह यांचा निवडून आल्यानंतर 90 दिवसांनी खून झाला होता. अशोक सिंह यांनी प्रभुनाथ सिंह यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. तेव्हा जनता दलात असलेले प्रभुनाथ सिंह नंतर जेडीयूमध्ये सामील झाले होते. आता ते आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) मध्ये आहेत.
माझ्या भावाने प्रभुनाथ सिंह यांना पराभूत केले होते. खासदार बनल्यानंतर 90 दिवसांच्या आत त्याला ठार मारण्यात येईल असे प्रभुनाथ सिंह यांनी उघडपणाने सांगितले होते आणि बरोबर 90व्या दिवशी अशोक सिंह यांचा खून करण्यात आला, असे अशोक सिंह यांचे बंधू तारकेश्‍वर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही केस बिहारमधून झारखंडच्या हजारीबाग न्यायालयात वर्ग करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)