माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर यांचे निधन 

बंगळुरू: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर शरीफ यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुली आहेत. जाफर यांनी 1991 ते 1995 या कालावधीत रेल्वेमंत्रिपद भूषवले होते.

जाफर यांना गेल्या शुक्रवारी बेंगळुरूतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रविवारी हृदय प्रत्यार्पणाची शस्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. कॉंग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी जाफर यांच्या निधनाची माहिती दिली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जाफर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

-Ads-

जाफर शरीफ यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 रोजी चित्रदुर्ग येथील चाळकेरे येथे झाला होता. त्यांनी तब्बल 50 वर्षे राजकीय कारकीर्द घडविली. ते कर्नाटकातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते होते. 1991मध्ये त्यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद सोपवले होते. त्यावेळी पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते. ऑक्‍टोबर 1995 पर्यंत त्यांनी रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)