माजी केंद्रीय कोळसा सचिव गुप्ता, दोन अधिकारी दोषी

  • कोळसा घोटाळ्याशी संबंधित प्रकरण

नवी दिल्ली – कोळसा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज माजी केंद्रीय कोळसा सचिव एच.सी.गुप्ता आणि सध्या सेवेत असणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरवले. त्यांना 22 मे यादिवशी शिक्षा ठोठावली जाणार आहे.
मध्यप्रदेशातील एका कोळसा खाणीचे वाटप कमल स्पंज स्टील अँड पॉवर लि. या खासगी कंपनीला करण्यात आले. या वाटप प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यावरून न्यायालयाने भ्रष्टाचार आणि फसवणुकीबद्दल गुप्ता यांच्याबरोबरच के.एस.क्रोफा, के.सी.समरिया या अधिकाऱ्यांना आणि संबंधित कंपनी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार अहलुवालिया यांना दोषी ठरवले. गुप्ता 31 डिसेंबर 2005 ते नोव्हेंबर 2008 या कालावधीत कोळसा सचिव होते. त्या कालावधीत क्रोफा कोळसा मंत्रालयात सहसचिव तर समरिया संचालक होते. दरम्यान, गुप्ता यांच्याविरोधात कोळसा घोटाळ्याशी संबंधित आणखी दहा खटले प्रलंबित आहेत. त्यांची सुनावणी स्वतंत्रपणे सुरू आहे. या खटल्यांची सुनावणी एकत्रितपणे घेतली जावी, अशी विनंती करणारी गुप्ता यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी फेटाळून लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)