माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम हद्दपार !

राठोड, गांधी, भोर व वाकळे यांनी शर्तीचा भंग केल्यास कारवाई 

नगर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला प्रशासनाने हद्दपार केले आहे. छिंदमबरोबर पाच जणांवर ही कारवाई झाली आहे. संजीव भोर, विक्रम राठोड, सुवेंद्र गांधी, कुमार वाकळे यांच्यासह 14 जणांना अटी व शर्तीवर शहरात राहता येणार आहे. परंतु यांनी निवडणुकीच्या काळात शर्तीचा भंग केल्यास त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या सुमारे 671 जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील 450 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात काही महापालिकाचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. प्रातांधिकारी उज्वला गाडेकर यांनी काल रात्री उशिरा 17 जणांविरोधात हद्दपारीची कारवाई केली.

माजी महापौर श्रीपाद छिंदम याचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरलेल्या छिंदमवर हद्दपारीची कारवाई झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी छिंदम याने अपशब्द समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यावरून संपूर्ण राज्यात वाद उफाळला होता. भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर असल्याने पक्षाला त्याची हानी झाली होती.

पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी त्याची दखल घेत छिंदम याला पक्षातून हकालपट्टी केली. यावर देखील छिंदम याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरून महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. छिंदमबरोबर ओंकार कराळे, मनोज कराळे, भाऊसाहेब कराळे व दीपक खैरे या पाच जणांविरोधात हद्दपारीची कारवाईचा आदेश आहे.

 171 जणांना अटी व शर्ती

संजीव भोर, विक्रम राठोड, सुवेंद्र गांधी, कुमार वाकळे, चंद्रकांत उजागरे, भूपेंद्र परदेशी, प्रशांत गायकवाड, गजेंद्र सैंदर, नरेंद्र कुलकर्णी, दीपक आडेप, शिवाजी अनभुले, दिंगबर ढवण, अशोक दहिफळे आणि प्रकाश सैंदर या 14 जणांना अटी व शर्ती देत शहरात राहता येणार आहे. 50 हजार रुपयांचा बॉण्ड, स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी आदी अटी व शर्ती असणार आहे. प्रशासनाने आतापर्यंत 171 जणांना अटी व शर्ती देत शहरात राहता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
104 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)