माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना अटक

वीस वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कारवाई
अहमदाबाद – गुजरात दंगल प्रकरणात नरेंद्र मोदी यांचा विरोध करणारे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना बुधवारी गुजरात सीआयडीने अटक केली आहे. ही कारवाई 1998 मधील अमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात करण्यात आली आहे. यात भट यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

गुजरातमधील पालनपूर येथे 1998 संजीव भट यांच्या पथकाने समरसिंह राजपुरोहित यांना अटक केली होती. राजपुरोहित हे वकील असून त्यांच्याकडून एक किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी माझ्या खोलीत अमली पदार्थ आणून ठेवले आणि मला खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा दावा राजपुरोहित यांनी केला होता. भट हे त्याकाळी बनासकांठाचे पोलीस अधीक्षक होते.

या प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने सीआयडीला तपासाचे आदेश दिले होते. तीन महिन्यात तपास करून त्याचा अहवाल सादर करावा, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. यानंतर गुजरात सीआयडीने केलेल्या तपासात राजपुरोहित यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे स्पष्ट झाले.

तसेच पोलिसांनी राजपुरोहित यांचे राजस्थानमधील निवासस्थानातून अपहरण केल्याचेही उघड झाले. अखेर पोलिसांनी बुधवारी भट यांच्यासह सात जणांना अटक केली. यात निवृत्त पोलीस निरीक्षक आय. बी. व्यास यांचा देखील समावेश आहे. सर्व आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. दीर्घ काळापासून कामावर गैरहजर राहिल्याने संजीव भट यांना गुजरात पोलीस दलातून 2015 मध्ये बडतर्फ करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)