माजी अधिकाऱ्याकडे दीड कोटींची बेकायदा माया

कृषी विभागात संचालक म्हणून होते कार्यरत : पत्नी, मुलावरही गुन्हा दाखल

पुणे : निवृत्त विस्तार शिक्षण व साधन सामग्री संचालकाकने पत्नी आणि मुलाच्या मदतीने 1988 पासून दीड कोटींची बेकायदेशीर माया कमावल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरुध्द लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची तपासणी केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरेश नामदेव अंबुलगेकर (वय 60) असे संचालकाचे नाव असून ते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत कार्यरत होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मंगाराणी सुरेश अंबुलगेकर (वय 56) आणि मुलगा नितीन सुरेश अंबुलगेकर (वय 30,
सर्व रा.मु.पो. मुखेड ता. मुखेड जि.नांदेड) यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी तक्रार दिली होती. तर, प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी केला.

अंबुलगेकर यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान त्यांनी जुलै 1980 ते जुन 2014 या कालावधीत 1 कोटी 55 लाख 15 हजार 426 रुपयांची संपत्ती कामावली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कामात त्यांना पत्नी व मुलगा यांनी जाणीवपूर्वक संगनमत करून अपप्रेरणा दिली असल्याचे निष्पन्न झाले.

नांदेड, औरंगाबाद, लातूर आणि पुण्यात मालमत्ता
अंबुलगेकर यांची नांदेड, औरंगाबाद, लातूर आणि पुणे येथे मालमत्ता असल्याचे तपासातून समोर आले. यामध्ये अनेक सदनिका आणि भुखंड असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. त्यांची 2014 पासून चौकशी सुरू होती. या काळात त्यांनी ही सगळी संपत्ती कशाच्या माध्यमातून कमावली याची कागदपत्रे पोलिसांनी मागितली होती. मात्र या संपत्तीबाबत ते कोणतेही योग्य कागदपत्रे देऊ शकले नाहीत. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि पुण्यात असलेल्या मालमत्तेवर छापे टाकले. त्यानंतर तिघांवरही विभागाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)