माजीमंत्री शंकरराव कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी

कोपरगाव – संजीवनी उद्योगसमूहाचे संस्थापक, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान नीलवसंत मेडिकल व रिसर्च फाउंडेशन, तसेच मणिशंकर आय हॉस्पिटलच्या संयुक्‍त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. शिबिरासाठी नीलवसंत रिसर्च व मेडिकल फाउंडेशनच्या डॉ. प्राची पवार व त्यांचा वैद्यकीय अधिकारी वर्ग विशेष सहकार्य देत आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, आतापर्यंत सात हजार रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करून तीन हजार रुग्णांना चष्म्यांचे वाटप केले आहे. तर, एक हजार रुग्णांवर मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 24 मार्च रोजी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा 89 वा वाढदिवस असून ते 90 व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. निमित्त रवंदे येथे जि. प. प्राथमिक शाळा (24 मार्च), कोकमठाण (25 मार्च), राहाता तालुक्‍यातील जळगाव येथील सांस्कृतिक भवनात (27 मार्च) व मुर्शतपूर (29 मार्च) या चार ठिकाणी मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले असून, शिबिराच्याच ठिकाणी त्याची नावनोंदणी होणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, संजीवनी उद्योगसमूहातर्फे तालुक्‍यातील प्रत्येक गावांत वृक्षारोपण, विविध उपयोगी साहित्यांचे वाटप, रुग्णांना गरजेच्या वस्तू वाटप केल्या जातात. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक घटकांसाठी मोठ्या प्रमाणांत सामाजिक कार्य केलेले आहे. समाजाच्या ऋणांतून उतराई होण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान हा उपक्रम राबवीत आहे, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)