माजगावत रंगले भजनी भारुड

चिंबळी- माजगाव (ता. खेड) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवारी (दि. 4) व सोमवारी (दि. 5) भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम रंगले होते. या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर या दोन्ही दिवशी रंगलेल्या भारुडांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करून भव्य मंडप उभारण्यात आला होता. उत्सावानिमित्त रविवारी पहाटे काकडी आरती, महापूजा, अभिषेक तर दुपारी चार वाजता देवाच्या काठीची मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात काढून रात्री आठ वाजता हारतुरे, भैरवनाथ महाराजाच्या पालखीची मिरवणूक व आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तर रात्री करमणुकीसाठी कोडींवडे (ता. मावळ) येथील गणेश नाट्य मंडळ, भैरवनाथ कला नाट्य मंडळ यांचा भजनी भारूडाचा शुभारंभ माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर जैद, सदस्य आप्पासाहेब बटवाल, पवन पाटारे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी अध्यक्ष खंडू पाटारे, गुरूदास उबंरकर, मारूती पाटारे, नामदेव पाटारे, लक्ष्मण कातोरे, अर्जुन कातोरे, गणेश जाधव, सचिन जाधव, पांडुरंग पाटारे आदि मान्यवरांसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते व यांनी उपस्थित राहून माजगाव येथील भैरवनाथ महाराजांचा उत्सवाच्या व दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी सभापती विलास कातोरे, संचालक पांडुरंग बनकर, पंचायत समितीचे सदस्य अमर कांबळे, दादासाहेब जैद आदि मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)